जालना मराठा आंदोलन : चंद्रशेखर बावनकुळेंना काळे झेंडे दाखवणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

दोलनकर्त्यांना बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना दुपारी तीन वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात येणार आहे.
जालना मराठा आंदोलन : चंद्रशेखर बावनकुळेंना काळे झेंडे दाखवणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Published on

जालन्याच्या अंबड तालुक्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील अमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलकर कर्त्यांवर केलेल्या अमानूष लाठी हल्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रीय महामार्गाने अकोला येथे संवाद यात्रेसाठी जाणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्षत्र चंद्रशेखर बावनकुळेंना ताफा शेळद फाट्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवून जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध व्यक्त केला गेला. यावेळी बाळापूर पोलिसांकडून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरावली गावात शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या बांधवांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला यात लहान मुलांसह स्त्रिया देखील जखमी झाल्या आहेत. या घटनेचा राज्यभरातून निषेध केला जात असून सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आज अकोला ते खामगाव मार्गावरुन भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अकोला येथे संवाद यांत्रेसाठी जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवत जालन्यातील घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी बावनकुळेंना काळे झेंडे दाखवणाऱ्या देवानंद साबळे, गोपाल पोहरे, प्रशांत गायकवाड विष्णू अरबट ऋषिकेश साबळे,अंकरित डीवरे यांच्यासह अनेकांचा सहभाग होता. या सर्वांना बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

गृहमंत्री फडणवीसांची राजीनाम्याची मागणी

दरम्यान, या लाठीचार्जच्या निषेध संपूर्ण महाराष्ट्र भरातून केला जात आहे. या सर्व आंदोलकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसंच राज्यातील महायुतीच्या सरकारविरोधात घोषणा दिल्या. आंदोलनकर्त्यांना बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच त्यांना दुपारी तीन वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in