जालना मराठा आरक्षण आंदोलन : शरद पवारांसह उध्दव ठाकरे घेणार आंदोलकांची भेट

आज गावांमध्ये जाऊन आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
जालना मराठा आरक्षण आंदोलन : शरद पवारांसह उध्दव ठाकरे घेणार आंदोलकांची भेट

काल(1सप्टेंबर) जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावात गेल्या चार दिवसांपासून अमरण उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी (शुक्रवारी) अमानूष लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे आंदोलकांनी आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली. त्या परिसरात मोठ्या प्रमाणवार जाळपोळ झाल्याचे दिसून येत आहे.

यामध्ये काही आंदोलक आणि पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणंही चांगलंच तापल्याचं दिसून आलं.

आज पहाटेच अंतवरली सराटी गावामध्ये जाऊन संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलकांची भेट घेतली. तसेच या घटनेमध्ये जखमी झालेल्यांची देखील भेट घेतली. रूग्णालयात जाऊन त्यांची चौकशी केली.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे आज त्या गावांमध्ये जाऊन आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

तसेच अंबड रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस करणार आहेत. त्याचबरोबर ते पत्रकार परिषद देखील घेणार असल्याचं बोललं जातं आहे.

त्याचबरोबर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी अंबड आणि आंतरवाली सराटी गावांना भेट देणार आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मराठा कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. कालच पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे मराठा समाजात अतिशय तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. उद्धव ठाकरे पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्याची अंबड शासकीय हॅास्पिटलमध्ये जाऊन भेट घेणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in