22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर; शाळा कॉलेजसह कोणती कार्यालये राहणार बंद?

महाराष्ट्र सरकारनेही सोमवारी म्हणजे 22 जानेवारीला सरकारी कार्यालयं, शाळा-कॉलेजला सुट्टी असेल असं जाहीर केलं आहे.
22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर; शाळा कॉलेजसह कोणती कार्यालये राहणार बंद?

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने देशासह जगभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा सोहळा सर्वांना पाहाता यावा, यासाठी 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 22 जानेवारीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सु्ट्टी जाहीर केली.त्यानंतर काही राज्यांमध्ये पूर्ण दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील तसाच निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनेही सोमवारी म्हणजे 22 जानेवारीला सरकारी कार्यालयं, शाळा-कॉलेजला सुट्टी असेल असं जाहीर केलं आहे.

22 जानेवारीला महाराष्ट्रात काय बंद राहणार?

• राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालये बंद राहतील.

• सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापना दुपारी 2:30 वाजेपर्यंत बंद राहतील.

• राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्या देखील दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस पाळतील

राज्यातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे राज्यात सु्टटी जाहीर करण्याची मागणी केली होती. आमदार सत्यजीत तांबे, आमदार राम कदम यांच्यासह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती. सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालयं; शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर करावी अशी विनंती यात पत्रात करण्यात आली होत.

दरम्यान पुण्यात 22 तारखेला चिकन, मटणची दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय पुणे शहर कुरेशी समाजाने घेतला आहे. मटण आणि चिकन विक्री दुकाने तसंच सर्व व्यवहार बंद करून, प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लाडू आणि पेढे वाटप करुन या उत्सवात सहभागी होणार आहेत. कुरेशी समाजाच्यावतीने हे जाहीर करण्यात आलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in