'सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे' जरांगे यांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा...

मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही
'सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे' जरांगे यांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा...

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकाळी फोनवरून संवाद साधला आहे. त्यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. ही चर्चा अर्धा तास सुरु होती. ही चर्चा कुणब प्रमाणपत्र, विशेष अधिवेशन अशा विविध मुद्द्यांवर झाली. मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही, असं ही मनोज जरांगेनी मुख्यमंत्र्यांना सांगितल आहे. जालन्यातील आंदोलनस्थळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरक्षणाबाबत चर्चा झाली होती. त्या चर्चेत पुढं मनोज जरांगे म्हटलं की, आपण त्यांना स्पष्टपणे सांगितल, नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही.आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितल आहे. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा 2004 चा GR दुरुस्त करावा. शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे आम्हला सांगितले तरी आम्ही आता ऐकणार नाही. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. आम्हला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 60 -65 टक्के मराठा समाज आधीपासूनचं obc मध्ये आहे, आता आम्ही थोडे शिल्लक आहोत. विशेष अधिवेशन घ्यावे . ज्याचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत. मराठवड्यात कागदपत्रे जमा करा आणि सर्व महराष्ट्राला आरक्षण द्यावे. विशेष अधिवेशन घ्या.

कालपासून मी पाणी पितोय, मी पाणी पिल्यानंतर मराठा समाज शांत होणार असेल तर मी पाणी पिणार. मी परत एकदा सगळयांना सांगतो उद्रेक करू नये, आत्महत्या करू नका. खांद्याला खांदा लावून लढत राहा. पाण्यामुळे तब्येत चांगली झालीय, उठून बसलोय. सगळीकडे शांततेत उपोषण सुरू आहे. आमरण उपोषण जसं सहन होईल तसं करा, मात्र साखळी उपोषण सुरू ठेवा, असं ही आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in