जरांगे-पाटलांचे पुन्हा आमरण उपोषण

मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी मागील महिन्यातच हजारो मराठा समाजाचा हजारोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला होता
जरांगे-पाटलांचे पुन्हा आमरण उपोषण

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला ९ फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण झाले; मात्र अद्याप सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने शनिवारपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी मागील महिन्यातच हजारो मराठा समाजाचा हजारोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला होता; मात्र हा मोर्चा वाशीपर्यंत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याने त्यांचा मोर्चा विसर्जित झाला; मात्र आता दोन आठवड्यानंतर जरांगे-पाटील पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

अध्यादेशाची अंमलबजावणी नाहीच

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून कायदा करण्याच्या मागणीसाठी जरांगे-पाटील हे उपोणाला बसले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला ९ फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण झाले; मात्र अद्याप सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने शनिवारपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा जरांगेंनी दिला आहे.

आमचा प्रश्न सुटला नाही- मनोज जरांगे-पाटील

मनोज जरांगे म्हणाले, सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही. आमचा प्रश्न सुटला नाही. आता १५ फेब्रुवारीपासून अधिवेशन आहे. परंतु, राज्य सरकारकडून पुन्हा तसा दगाफटका झाला, तर माझ्या समाजाला ते परवडणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in