Maratha Reservation: आंदोलनाला हिंसक वळण येतं असल्यानं जरांगे आज पासून पिणार पाणी....

मनोज जरांगेंच्या आवाहनानंतरही राज्यात काही भागात हिंसक आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे एक पत्रकार परिषद घेणार आहेत.
Maratha Reservation: आंदोलनाला हिंसक वळण येतं असल्यानं जरांगे आज पासून पिणार पाणी....

राज्यात मराठा आरक्षणासाठी लोकांनी हिंसक रूप धारण केलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी इथं आमरण उपोषण सुरु केलं. आज जरांगे यांचा उपोषणाचा सातवा दिवस असून त्याची प्रकृती खालावत आहे. राज्यातील मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे जरांगे आजपासून पाणी पिणार आहेत. मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आता मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. आंदोलनाला हिंसक वळण येत असल्यानं आंदोलकांच्या आग्रहान जरांगे पाणी घेणार आहेत. पाणी घेतं नसल्यानं तब्येत खालावत असल्याने आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगे यांनी आता हा निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगेंच्या आवाहनानंतरही राज्यात काही भागात हिंसक आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे एक पत्रकार परिषद घेणार आहेत. जरांगे काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी फोनवरुन चर्चा केल्यानंतर थोड्याच वेळात माध्यमांशी बोलण्याचा निर्णय जरांगेनी घेतल आहे. जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर येतं आहे. मनोज जरांगे पाटील त्यासंदर्भात पत्रकार परिषदेत तपशील देणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in