जयंत पाटलांचा अजित पवारांना मिश्किल शब्दात टोला आणि सभागृहात हसू फुटलं

मुख्यमंत्र्यांनी पहिलचं नाव अजित पवार यांचं घेतल्यामुळे विरोधी बाकांवरुन प्रतिक्रिया येण्याचा अंदाज होता, तो खरा ठरला
जयंत पाटलांचा अजित पवारांना मिश्किल शब्दात टोला आणि सभागृहात हसू फुटलं

आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिच्याचं दिवस असल्यानं नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सभागृहाचं कामकाज सुरु झालं. आवेळी विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या मंत्र्यांचा परिचय करुन देण्याचे निर्देश दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित मंत्र्यीची ओळख करुन द्यायला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिलचं नाव अजित पवार यांचं घेतल्यामुळे विरोधी बाकांवरुन प्रतिक्रिया येण्याचा अंदाज होता, तो खरा ठरला.

एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांची ओळख करुन देताना 'उपमुख्यमंत्री व वित्त' असा उल्लेख करून ते थांबले. यावेळी त्यांनी पलिकडच्या बाकावर बसलेल्या अजित पवार यांच्याकडे पाहीलं. ते पाहून बाजूलाच बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना नाव सांगण्यास सांगितलं. यानंतर शिंदे यांनी अजित पवारांचं नाव घेतलं.

अजित पवार यांचं नाव घेतल्यानंतर त्यांनी उभं राहून सर्वांना नमस्कार केला. अजित पवार नमस्कार करुन खाली बसत असताना. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाचे जयंत पाटील यांनी त्यांना मिश्किल शब्दात टोला लगावला. यावेळी जयंत पाटील यांनी "त्यांची आमची जुनी ओळख आहे." असं म्हणात सभागृहात हासू फुटलं. यावेळी अजित पवार यांच्या चेहऱ्यावर देखील हास्याची लकेर उमटली.

अजित पवार यांची ओळख करुन दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या गटाच्या इतर मंत्र्यांची देखील ओळख करुन दिली. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश होता.

logo
marathi.freepressjournal.in