अजित गटाकडून जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर बोट; राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीतील घडामोड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पवार गटाकडून जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरच बोट ठेवण्यात आले आहे. जयंत पाटील हे निवडून आलेले नव्हे, तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अजित गटाकडून जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर बोट; राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीतील घडामोड

प्रतिनिधी/मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पवार गटाकडून जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरच बोट ठेवण्यात आले आहे. जयंत पाटील हे निवडून आलेले नव्हे, तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर त्याला प्रतिवाद म्हणून मी निवडून आल्यामुळेच प्रदेशाध्यक्ष झालो आहे, यासंदर्भातील पत्र प्रफुल पटेल यांच्याकडून देण्यात आल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा कधी राजीनामा दिलाच नव्हता. तर त्यांनी फक्त राजीनामा देण्याची इच्छा प्रदर्शित केली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचीही सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणीदरम्यान अजित पवार गटाच्या वकिलांनी जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ २०२२ सालीच संपला असल्याचे वकिलांनी यावेळी दाखवून दिले. त्यावर जयंत पाटील यांनी सुमारे तीन वर्षांसाठी निवड असल्याने कार्यकाळ संपत नाही. पुढील निवडीपर्यंत किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरूच राहतो. त्यावर अजित पवार गटाच्या वकिलांनी जयंत पाटील हे निवडून आलेले नाही तर नियुक्त झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा दावा केला. त्यावर मी निवडून आलेलो असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. मला प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचे पत्र प्रफुल्ल पटेल यांनी पाठवल्याचा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांना पक्षांतर्गत रचनेबाबत ९० प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर त्यांची उलटतपासणी संपली. त्यापाठोपाठ अमोल कोल्हे यांची उलटतपासणी घेण्यात आली. यावेळी दोघांनाही २ जुलै रोजीच्या शपथविधी सोहळ्याविषयीची माहिती होती का, याबाबत विचारण्यात आले असता अमोल कोल्हे यांनी आपल्याला नेते सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या घरी बैठक असल्याचे सांगितले होते, असे स्पष्ट केले. जयंत पाटील यांनी आपण याबाबत अनभिज्ञ होतो, असे सांगितले.

मी २०१९ पासून या पदावर -जयंत पाटील

२०१८ साली माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. मी २०१९ पासून या पदावर आहे. २०२२ साली विविध जिल्ह्यांमध्ये निवडणुका पार पडत होत्या. विविध राज्यांत निवडणुका पार पडल्या होत्या. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. २०१८ साली निवडणूक झाली, त्यात माझी राज्य प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाली. २०२२ मध्ये राज्य पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. त्यात काही जिल्ह्यातील पदाधिकारी निवड झाली, तर काही जिल्ह्यात ती सुरू होती. राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यातील पदाधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण झाली. राष्ट्रीय निवडणुकीत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर दिल्लीत नॅशनल कन्व्हेन्शन पार पडले. त्यात शरद पवार यांना कार्यालय निवडीचे सर्वाधिकार देण्यात आले. इतर राज्यातील प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत मला माहिती नाही, पण माझ्या निवडीचे पत्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मला मिळाले, असे जयंत पाटील म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in