"...तर माझ्यासाठीही पहाटेचा शपथविधी कार्यक्रम होऊ शकतो, पण..."; जयंत पाटील यांचे वक्तव्य

बोरगाव येथील बिरोबा सोसायटीच्या शताब्दी समारंभ व बहुउद्शीय सभागृहात उद्घाटनावेळी जयंत पाटील यांनी हे वक्यव्य केले.
"...तर माझ्यासाठीही पहाटेचा शपथविधी कार्यक्रम होऊ शकतो, पण..."; जयंत पाटील यांचे वक्तव्य

नाशिक : एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रमही होऊ शकतो. पण, मी शरद पवारांसोबत गद्दारी करणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. बुधवारी बोरगाव येथील बिरोबा सोसायटीच्या शताब्दी समारंभ व बहुउद्शीय सभागृहात उद्घाटनावेळी पाटील यांनी हे वक्यव्य केले.

"महाराष्ट्रात अस्थिर असणाऱ्या भाजपला पश्चिम महाराष्ट्रातील आपले संघटन मजबूत करायचे आहे. म्हणून भाजपचे नेते आपल्याभोवती जाळे फेकत आहेत. एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रमही होऊ शकतो. परंतु ज्यांनी आपले राजकीय जीवन फुलवले आहे, अशा शरद पवारांसाठी आपण कोणताही त्याग करायला तयार आहोत", असे पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात वेगळा निकाल लागण्याची भीती

महाविकास आघाडीची बुधवारी नाशिकच्या दिंडोरीत देखील सभा पार पडली. या सभेतून पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पाटील म्हणाले, दररोज महाराष्ट्र स्तरावर उद्घाटन आणि नवनव्या घोषणा होत आहेत. मंत्रिमंडळाचे कोट्यवधी रुपये जणू काही हे पैसे आपल्याला द्यायचे नाहीत. फक्त जाहीर करायचे आहे. या भावनेने सर्व काही होत आहेत. यातून माझ्यासारखा कार्यकर्ता एकच अर्थ काढतो की, राज्य सरकार घाबरले असून महाराष्ट्रात वेगळा निकाल लागेल याची त्यांना धास्ती वाटत आहेत. त्या भीतीने जमेल ते आणि असेल ते तिजोरीतील द्या. घोषणा करा त्याचे असेल तर नंतर बघू. या भावनेने राज्य चालले आहे", अशी टीका त्यांनी केली आहे.

संविधान बदलण्यासाठी ४०० पार आहे का?

भाजपच्या ४०० पारवर बोलताना पाटील म्हणाले, "आता अब की बार ४०० पारची घोषणा होत आहे. देशातील संविधान बदलण्यासाठी ४०० पार आहे का? भारतासाठी संविधान हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. ते बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात का? या सर्वांचे भाजपने भारताला उत्तर दिले पाहिजे", असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in