महाराष्ट्र
जयदत्त क्षीरसागर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी
बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी केली आहे. या घोषणेमुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधणे शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना चांगले भोवले आहे. जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी केली आहे. या घोषणेमुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
बीड शहरातील सिमेंट रस्ता व नालीच्या ७० कोटींच्या विकासकामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ करण्यात आले होते. जयदत्त क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे शनिवारी जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन क्षीरसागर यांच्यावरील कारवाईची घोषणा केली. क्षीरसागर यांनी कुठल्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकला नाही. मुंबईत जाऊन त्यांची कधी भेट घेतली नाही.