कृष्णकुमार गोयल यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार

विद्यापीठाच्या वर्धापनदिनी जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कृष्णकुमार गोयल यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्त्व कृष्णकुमार गोयल यांना जगद्गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या वर्धापनदिनी जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी श्री श्री रविशंकर यांनी संवादातून सामंजस्य प्रस्थापित होते. छोट्या छोट्या गोष्टींमुळे माणसांमध्ये तणाव निर्माण होत असून या संघर्षाला संवाद महत्त्वाचा आहे आणि संवादातूनच सहयोग परावर्तित होऊ शकतो शिक्षणाचा मूळ हेतू संघर्षाला सहयोगात परावर्तित करणे, असे प्रतिपादन केले. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in