बसमधून २१ लाखांचे दागिने केले लंपास

सायंकाळी सव्वा पाच वाजता बस कवठे गावच्या हद्दीत आल्यानंतर तेथील राज हॉटेल समोर थांबली होती.
बसमधून २१ लाखांचे दागिने केले लंपास

पुण्याहून कोल्हापूरला नातेवाइकाच्या विवाहासाठी शिवशाही बसने निघालेल्या संजय कृष्णा गांजवे, रा. पिसोळी, पुणे यांच्या जवळच्या बॅगेतील २१ लाख रुपयांचे दागिने बस कवठे,ता.वाई येथील राज हॉटेलच्या समोर उभी करण्यात आली असता परिसरातून चोरून नेल्याची घटना शुक्र. १२ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता घडली.

संजय गांजवे हे त्यांची पत्नी शुभांगी आणि सून ऋत्विका असे तिथे कोल्हापूरला शुक्र. १२ रोजी पुण्याहून कोल्हापूरला नातेवाइकाच्या विवाहासाठी शिवशाही बसने निघाले होते.सायंकाळी सव्वा पाच वाजता बस कवठे गावच्या हद्दीत आल्यानंतर तेथील राज हॉटेल समोर थांबली होती. त्यावेळी चहा पिण्यासाठी तिघेही खाली उतरल असता चहा पिल्यानंतर फ्रेश होऊने ते पुन्हा बसमध्ये बसले. रात्री ८.३० वाजता बस कोल्हापूरला पोहोचली व ते सर्व घरी गेल्यानंतर दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर शनिवार १३ रोजी पुन्हा ते सर्व पुणे येथे एस.टी. ने पोहचले व घरात दागिने शोधले मात्र तेथेही दागिने सापडले नाहीत. अपार्टमेंटमधील लिफ्टमधील सी.सी.टी.व्ही. तपासणी केली असता तेथेही कोणी बाहेरील आल्याचे आढळले नाही. दरम्यान, शिवशाहीमधील सी.सी.टी.व्ही. फुटेज मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला मात्र ते मिळाले नाही. कवठे येथील राज हॉटेल एस. टी. बस फक्त २० मिनिटे थांबली होती . यावेळी बसमधून खाली उतरताना सुनेने सासूला दागिने कुठे आहेत, असे विचारले होते, त्यावर सुनेने दागिने बसमध्ये बॅगेत आहेत असे सांगितले होते. हे संभाषण ऐकून कोणीतरी बसमधून दागिने चोरले आहेत. त्यामध्ये लाख ३२ हजाराचे ४७ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, २ लाख ५७ हजाराचे टेम्पल डिझाइनचे ५२ ग्रॅमचे गंठण, २ लाख २० हजार रुपयांचा ४५ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, १ लाख ५५ हजाराचा सोन्याचा नेकलेस, १ लाख ८० हजाराचा सोन्याचा नेकलेस, २ लाख ९६ हजाराच्या चार सोन्याच्या बांगड्या, १९ हजाराच्या दोन अंगठ्या, ९७ हजार रुपयांचे सोन्याचे दोन कंगण, २ लाख ९० सोन्याच्या चार बांगड्या, १ लाख असा सुमारे २१ लाख ४६ हजार ७०८ रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार भुईंज पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in