400 मुलांच्या धर्मांतर प्रकरणावर जितेंद्र आव्हाड आक्रमक, म्हणाले, "चार मुलं जरी..."

या प्रकरणाचे धागेदोर थेट ठाण्यातील मुंब्रापर्यंत आले आहेत.
400 मुलांच्या धर्मांतर प्रकरणावर जितेंद्र आव्हाड आक्रमक, म्हणाले, "चार मुलं जरी..."

सध्या देशाता ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली धर्मांतर केल्याचं प्रकरण चर्चेत आहे. दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली धर्म परिवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गाझियाबादमधील मशिदीचा मौलवी अब्दुल रहमान उर्फ नन्नी याला अटक केली आहे. त्याची चौकशी केल्यानंतर त्यानं अल्पवयीन मुलांवर कट्टरतावाद केल्याची कबुली पोलिसांना दिली. आता या प्रकरणाला एक नव वळण लागलं आहे. या प्रकरणाचे धागेदोर थेट ठाण्यातील मुंब्रापर्यंत आले आहेत.

पोलिसांनी आरोपी रहमान याची कसून चौकशी केली असता त्याने या प्रकरणातील एक आरोपी ठाण्यातील मुंब्रा येथील असल्याचं सांगितलं. यानंतर गाझियाबाद पोलिसांची एक टीम मुंब्रात दाखल झाली. या पथकानं मुंब्रा पोलिसांच्या मदतीनं शहानवाज नामक आरोपीचा शोध घेतला असता तो गेल्या आठ- दहा दिवसांपासून घरी येत नसल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे गाझियाबाद ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सुरु असलेल्या धर्मपरिवर्तन प्रकारावर बोलताना आक्रमक झाले आहेत. 400 मुलांचं धर्म परिवर्तन प्रकरण हे मुंब्राला बदनाम करण्याचा काम आहे, असं आव्हाड म्हणाले आहेत. हा केवळ सनसनाटी निर्माण करण्याचा प्रकार असून या माध्यमातून मुंब्राला बदनाम केलं जात आहे. ही घटना खरी नसून या घटनेचं खंडन हे पोलिसांनी करायला हवं. राज्यात होणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी हा सर्व प्रकार सुरु आहे. यावेळी बोलताना धर्मांतर करणारी चार मुले दाखवली तरी आपण राजीनामा देऊ, असं आव्हान आव्हाड यांनी दिलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

शहानवाज मकसूद याने बड्डो नावाची बनावट आयडी बनवली होती. त्या आयडीद्वारे तो ऑनलाईन गेमवर उपस्थित राहत होता. 'फोर्ट नाईट' या ऑनलाईन गेममध्ये हिंदू मुलांना फसवण्याचं तो काम करत होता. मुस्लीम मुलांचे हिंदू नावांनी आयडी बनवून तो स्वत: खेळ खेळत होता. खेळताना हिंदू मुले हरल्यावर तो त्यांना कुराण वाचायला सांगत होता. कुराण वाचल्यानंतर खेळ खेळल्यास तो मुलगा जिंकत होता. यामुळे मुलाल कल मुस्लीम धर्माकडे होत होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in