
काल शरद पवारांनी आपली निवृत्ती जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून नवनवीन बातम्या समोर येत आहेत. शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी सर्व कार्यकर्ते, नेते आक्रमक झाले आहेत. अशातच आता शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून हा निर्णय घेतल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी देखील शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. अद्याप पवारांनी राजीनामा मागे घेतलेला नाही. म्हणून याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला, त्यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.