"मी ओघात बोलून गेलो..."; राम मांसाहारी होता या वक्तव्यावर आव्हाडांनी व्यक्त केला खेद

मी जे काही बोललो ते अभ्यासाशिवाय बोललो नाही. आमचा राम जात-पात न मानणारा आहे. शबरीची बोरे खाणारा आहे. जे राम-राम करतात त्यांना मी सांगेल की, तुमचा राम तुम्हाला निवडणुकीसाठी बाजारात आणायचा आहे. आमचा राम आमच्या हृदयात आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले.
"मी ओघात बोलून गेलो..."; राम मांसाहारी होता या वक्तव्यावर आव्हाडांनी व्यक्त केला खेद

"मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करणे माझ काम नाही. पण, मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. मला हा वाद वाढवायचा नाही. तरीही भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो", असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. आव्हाड यांनी काल(३ जानेवारी) शिर्डीतल्या मेळाव्यात राम मांसाहारी होता. १४ वर्षे वनवासात गेला होता, असे वक्तव्य केले होते. यावरुन मोठा गदारोळ होता.

मी जे काही बोललो ते अभ्यासाशिवाय बोललो नाही. आमचा राम जात-पात न मानणारा आहे. शबरीची बोरे खाणारा आहे. जे राम-राम करताना त्यांना मी सांगेल की, तुमचा राम तुम्हाला निवडणुकीसाठी बाजारात आणायचा आहे. आमचा राम आमच्या हृदयात आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले. तसेच, त्यांनी वाल्मिकी रामायणाचा दाखला देत आपण काहीचं चुकीचे बोललो नसल्याचे सांगितले.

काय आहे प्रकरण?

३ जानेवारी रोजी शिर्डी येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना आव्हाड यांनी राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र, आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्षे वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. या वादग्रस्त विधानामुळे आव्हाड यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली.

logo
marathi.freepressjournal.in