जेएन-१ व्हेरियंट आलाय : व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडर तयार ठेवा -मंत्र्यांची सूचना

लातूर येथे एका बैठकीत मंत्री म्हणाले की, आरोग्य विभागाने खबरदारीची उपाययोजना म्हणून सरकारी रुग्णालयांमध्ये आवश्यक उपकरणे उपलब्ध केली पाहिजेत.
जेएन-१ व्हेरियंट आलाय : व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडर तयार ठेवा -मंत्र्यांची सूचना

लातूर : राज्यात जेएन-१ कोविड व्हेरियंट विषाणूची लागण होण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री संजय बनसोडे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सरकारी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सिलिंडर साठा तसेच अन्य आवश्यक उपकरणे उपलब्ध ठेवण्याची सूचना केली आहे. 

लातूर येथे एका बैठकीत मंत्री म्हणाले की, आरोग्य विभागाने खबरदारीची उपाययोजना म्हणून सरकारी रुग्णालयांमध्ये आवश्यक उपकरणे उपलब्ध केली पाहिजेत. या बैठकीस जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे व अन्य ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. २१ डिसेंबरपर्यंत देशभरात २२ जेएन-१ व्हेरियंट कोविड रुग्ण आढळले आहेत. तसेच रविवारी एकाच दिवसात ६५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३७४२ झाली आहे. यामुळे प्रशासनाने आवश्यक उपकरणे तयार ठेवणे गरजेचे आहे. तसेच ऑक्सिजन प्लॅँटची स्थिती तपासून पाहण्याचीही गरज आहे. तसेच जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि अन्य आरोग्य सेवांची उभारणी लवकर पूर्ण करून ती कार्यान्वित करण्यासाठी लवकरच उपाययोजना कराव्यात, असेही मंत्र्यांनी यावेळी सांगितले. नव्या व्हेरियंटची लागण झाल्यामुळे जिल्ह्यात चाचणी संच उपलब्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वादगवे यांनी मंत्र्यांना दिली. नव्या रुग्णांसाठी विलासराव देशमुख सरकारी वैद्यकीय महाविद्यालात ५० बेड राखीव ठेवण्यात आल्याचे तसेच मॉक‌्ड्रील सुरू केल्याची माहिती देखील आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in