स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका; १ जुलैपर्यंतची मतदार यादी वापरणार

जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा व नगर पंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारी संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे बोलत होते.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. यासाठी १ जुलै २०२५ पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे, त्यादृष्टीने तयारी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी दिले.

जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा व नगर पंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारी संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी वाघमारे बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादी वापरली जाते. १ जुलैपर्यंत नावे नोंदविलेली यादी उपलब्धतेबाबत भारत निवडणूक आयोगाशी प्राथमिक चर्चा झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यी पद्धतीने घेण्यात येतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढेल, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in