NCCच्या ज्यूनियर विद्यार्थ्यांना सिनीअर विद्यार्थ्यांकडून मारहाण, आमदार रोहित पवार भडकले

रोहित पवार यांनी या घटनेची चौकशी करण्याची तसंच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
NCCच्या ज्यूनियर विद्यार्थ्यांना सिनीअर विद्यार्थ्यांकडून मारहाण, आमदार रोहित पवार भडकले
@RRPSpeaks

ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सिनीअर विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. हा मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. या घटनेच्या चौकशीची मागणी आता जोर धरु लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. तसंच या घटनेची चौकशी करण्याची तसंच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन यासंदर्भातील ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी अशी मारहाण प्रसिक्षणाचा बाग आहे का? आणि नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच विद्यार्थ्यांना अतिरेक्यांप्रमाणे झालेल्या मारहाणीच्या घटनेची सखोल चौकशी करुन यात दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in