
सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनेच्या बंडानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे २ गट पडले. यावेळी यामधील अनेक नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांचे इनकमिंग एकाकडून दुसऱ्या पक्षात सुरु आहेत. अशामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक ठाकरे गटाचे कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. कल्याणमध्ये आज अनेक ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत कल्याणमधील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत मुख्यमंतीर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.