Eknath Shinde : "अन्यथा 'पाटणकर काढा' घेण्याची वेळ येईल", एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा चांगलाचं समाचार घेतला.
Eknath Shinde : "अन्यथा 'पाटणकर काढा' घेण्याची वेळ येईल", एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एम एम महाविद्यालयाच्या प्रांगणात राज्यातील पहिला शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा चांगलाचं समाचार घेतला. 'जी-२०' परिषदेच्या निमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक भेटले. भारतीय माणूस म्हणून त्यांना भेटल्याचा आनंद झाला. या भेटीत त्यांनी ब्रिटनला या म्हणून सांगितलं. दरवर्षी लंडनला येतात आणि संपत्ती घेतात. थंड हवा खातात आणि भारतात परततात त्याची तुम्हाला सविस्तर माहिती देतो, असंही सुनक यांनी सांगितलं. त्यामुळे आमच्या भेटीवर टीका करणाऱ्यांनी जास्त बोलायला लावू नका. अन्यथा, 'पाटणकर काढा' घेण्याची वेळ येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऋषी सुनक-एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर टीका केली होती. शिंदे सुनक यांच्याशी काय बोलले असतील, असा खोचक स वाल त्यांनी उपस्थित केला होता. याचा शिंदेंनी जळवाच्या पाचोरा येथे पार पडलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात चांगलाच समाचार घेतला. ही टीका करणाता शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे मेहूणे श्रीधर पाटणकर यांच्यावर देकील अप्रत्यश्ररित्या निशाणा साधला.

गेल्या वर्षभरात महायुतीच्या शासनाने विकासाचा घडाका लावला आहे. त्यामुळे काहींना 'पोटदुखी'चा आजार जडला आहे. त्यामुळे लवकरच 'डॉक्टर आपल्या दारी' कार्यक्रम राबविला जाणार अससल्याची खोचक देखील त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, गिरीश महाजन, उदय सामंत, अनिल पाटील यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in