सुट्टीवर गावी आलेल्या लष्करी जवानाचे अपघाती निधन

केवळ तीनच दिवसापूर्वी महिन्याच्या सुट्टीवर आले होते.
सुट्टीवर गावी आलेल्या लष्करी जवानाचे अपघाती निधन

कराड : गुजरातमधील भुज येथे लष्कराच्या ५९, मराठा बटालियनमध्ये कार्यरत असणारे खटाव तालुक्यातील भुरकवडी गावचे सुपुत्र गणेश प्रल्हाद कदम (वय ३२) यांचे वडूज-पुसेगाव रोडवर खटाव येथील शिरसवस्ती नजीक उसाने भरलेल्या ट्रॉलीला धडक बसल्याने जागीच अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात लष्कर व पोलिसांनी मानवंदना देऊन व राष्ट्रगीत म्हणून बीएसएफच्या जवानानी बंदुकीच्या फैरी झाडून व सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक पाच वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. गणेश कदम हे केवळ तीनच दिवसापूर्वी महिन्याच्या सुट्टीवर आले होते. बुध. २८ रोजी ते कामानिमित्त खटावला गेले असता परत माघारी घरी येताना त्यांच्या स्कूटीला ट्रॅक्टर ट्रॉलीची जोरदार धडक बसल्याने त्यांच्या डोक्याला व उजव्या हाताला जबर मार लागल्यामुळे त्यांचे जागेवरच निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचे बुधवारी सायंकाळी उशिरा वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in