कराड : तुकाराम मुंढेंच्या दौऱ्यापूर्वी प्रशासनाची धडक कारवाई

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कराड दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाने शहरात धडक कारवाई केली.
कराड : तुकाराम मुंढेंच्या दौऱ्यापूर्वी प्रशासनाची धडक कारवाई
कराड : तुकाराम मुंढेंच्या दौऱ्यापूर्वी प्रशासनाची धडक कारवाई
Published on: 

कराड : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कराड दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाने शहरात धडक कारवाई केली. नामांकित दिवेकर बेकरीमध्ये अस्वच्छता आढळल्याने ती सील करण्यात आली, तर ऑनलाइन अन्नपदार्थ वितरण सेवा देणाऱ्या ‘ब्लिंकिट’च्या परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या दोन्ही आस्थापनांच्या पार्सल सेवांवरही निर्बंध घालण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे साताऱ्याचे उपायुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासनाच्या सातारा कार्यालयातील पथकाने उपायुक्त शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. दिवेकर बेकरीबाबत मिळालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. यावेळी अस्वच्छता आणि अन्य त्रुटी आढळून आल्याने पुढील आदेशापर्यंत बेकरी सील करण्याची कारवाई करण्यात आली.आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कराड येथे आयोजित व्याख्यानासाठी येणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in