कराडला आजीबाई चालवताहेत रिक्षा; अनेकांसाठी ठरताहेत आदर्श

कराड तालुक्यातील एक आजी ६५व्या वर्षी रिक्षा चालवून उपजीविका करत आहे. ही आजी अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.
कराडला आजीबाई चालवताहेत रिक्षा; अनेकांसाठी ठरताहेत आदर्श
Published on

कराड : कराड तालुक्यातील एक आजी ६५व्या वर्षी रिक्षा चालवून उपजीविका करत आहे. ही आजी अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.

कराड तालुक्यातील नांदगावच्या ६५ वर्षीय आजी मंगल आवळे या मुलाला संसारात हातभार लागावा, तसेच घरी बसून आजारी पडण्यापेक्षा कामात राहणे पसंद करीत प्रवासी रिक्षा चालवत आहेत. त्यांची ही जिद्द आणि धाडस बघून प्रवाशांकडून त्यांचे कौतुक होत आहे. खरंतर दुचाकी असो किंवा चारचाकी चालवताना महिलांना कसरत करावी लागते. मात्र कराड तालुक्यातील नांदगाव सारख्या ग्रामीण भागातील ६५ वर्षीय आजी चक्क गर्दीतूनही रिक्षा चालवतात. कसलीही भीती न बाळगता या आजी सराईतपणे रिक्षा चालवताना पाहून भल्या भल्यांच्या भुवया उंचावत आहेत.

मंगला आवळे यांचे पती त्यांची मुले लहान असतानाच या जगातून निघून गेले. तेव्हापासून त्या मोलमजुरी करून चार मुलांचा सांभाळ करत आहेत. मुलगा मोठा होऊन एसटीमध्ये चालक म्हणून काम करत आहे. मुलींची लग्ने झाली आहेत. मुलाचाही संसार चौकोनी झाला आहे. त्या मुलाच्या संसाराला हातभार लावावा, स्वतःच्या औषध पाण्याचा खर्च निघावा या उद्देशाने सुरुवातीपासूनच कष्टात आयुष्य घालवलेल्या मंगला आवळे या आजीने मुलाकडून रिक्षा शिकून घेऊन रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.

दररोज ५०० रुपयांची कमाई

सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्या रिक्षा चालवतात. त्यांना दररोज ५०० ते ६०० रुपये कमावतात. या पैशांत त्या घराला हातभार लावतात.

logo
marathi.freepressjournal.in