कराड : नगराध्यक्षासाठी २२ अर्ज, तर नगरसेवकपदासाठी ३३० अर्ज

कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी झालेल्या अखेरच्या दिवशी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दिवसभर इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले.
कराड : नगराध्यक्षासाठी २२ अर्ज, तर नगरसेवकपदासाठी ३३० अर्ज
Published on

कराड : कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी झालेल्या अखेरच्या दिवशी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दिवसभर इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५८ अर्जांचा समावेश आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत नगराध्यक्षपदासाठी एकूण २२ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी ३३० अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.

आज दाखल झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख अर्जांमध्ये विनायक पावस्कर (भाजप), इंद्रजीत गुजर (भाजप), राजेंद्र माने (भाजप), किरण थोरवडे (बसप), इमरान मुल्ला (बसप), गणेश कापसे (अपक्ष), रणजीत पाटील (अपक्ष), श्रीकांत घोडके (अपक्ष) यांचा समावेश आहे.

सोमवारी दाखल झालेल्या अर्जाची मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी कराड शहरातील शनिवार पेठेतील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र येथे अर्ज छाननी होणार आहे. प्रथम नगराध्यक्ष पदाची, त्यानंतर प्रभागनिहाय अर्जांची तपासणी केली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in