Karad : पाटण शहरातील ब्रिटिशकालीन धांडे पूल जमीनदोस्त; दीडशे वर्षांचा इतिहास पाडला, नव्या पुलासाठी मार्ग मोकळा

पाटण शहरातील ऐतिहासिक आणि ब्रिटिशकालीन धांडे पूल अखेर जमीनदोस्त करण्यात आला असून, दीडशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा पूल बुधवारी सकाळी प्रशासनाच्या उपस्थितीत पाडण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
Karad : पाटण शहरातील ब्रिटिशकालीन धांडे पूल जमीनदोस्त; दीडशे वर्षांचा इतिहास पाडला, नव्या पुलासाठी मार्ग मोकळा
Karad : पाटण शहरातील ब्रिटिशकालीन धांडे पूल जमीनदोस्त; दीडशे वर्षांचा इतिहास पाडला, नव्या पुलासाठी मार्ग मोकळा
Published on

कराड : पाटण शहरातील ऐतिहासिक आणि ब्रिटिशकालीन धांडे पूल अखेर जमीनदोस्त करण्यात आला असून, दीडशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा पूल बुधवारी सकाळी प्रशासनाच्या उपस्थितीत पाडण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

कोंकणातील गुहागर ते कर्नाटकातील विजापूरला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन राजमार्गाचे राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ई मध्ये रूपांतर झाल्यानंतर कराड-चिपळूण मार्गावरील रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. पाटण शहरातील केरा पूल ते रामापूर दरम्यान सुरू असलेल्या या कामात धांडे पुलाची रुंदी आणि उंची वाढविणे आवश्यक ठरल्याने जुना पूल हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रशासनाच्या देखरेखीखाली अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पुलाचे पाडकाम करण्यात आले. अनेक वर्षे वाहतुकीचा भार सहन केलेला हा पूल जीर्ण झाला होता आणि वाढत्या वाहतुकीसाठी अपुरा ठरत होता. त्यामुळे अधिक मजबूत, सुरक्षित आणि आधुनिक पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पूल पाडताना मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अनेकांनी या ऐतिहासिक पुलाशी जोडलेल्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

पूल पाडल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले असून प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. नवीन पूल लवकरच उभारला जाणार असून तो अधिक उंच, रुंद आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

नियोजनशून्य कारभारावर संताप

धांडे पूल पाडण्यापूर्वी एसटी वाहतुकीचे नियोजन करण्यात पाटण आगार अपयशी ठरल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. जुना बसस्थानक किंवा मार्केट यार्ड परिसरात तात्पुरता थांबा निर्माण करून तेथून कराड-सातारा बससेवा चालविणे शक्य असताना तसे न केल्याने विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे हाल झाले. सध्या वाहतूक नेरळेगौंड, गव्हाणवाडी फाटा, नवारस्ता मार्गे वळविण्यात आल्याने अंतर वाढले असून तिकीटदरही वाढले आहेत. त्यामुळे पाटण आगाराविरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in