आखाडीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये विशेष नाकाबंदी; मद्यधुंद अवस्थेतील १५ जणांवर कारवाई

आषाढ महिन्यात ग्रामीण भागात आखाडीच्या मांसाहारी पार्ट्यांमुळे मद्यप्राशनाचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कराड शहर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी विशेष नाकाबंदी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान ब्रेथ ॲनालायझरद्वारे वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालवित असल्याचे आढळलेल्या १५ वाहनचालकांवर मोटारवाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
आखाडीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये विशेष नाकाबंदी; मद्यधुंद अवस्थेतील १५ जणांवर कारवाई
आखाडीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये विशेष नाकाबंदी; मद्यधुंद अवस्थेतील १५ जणांवर कारवाई
Published on

कराड : आषाढ महिन्यात ग्रामीण भागात आखाडीच्या मांसाहारी पार्ट्यांमुळे मद्यप्राशनाचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कराड शहर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी विशेष नाकाबंदी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान ब्रेथ ॲनालायझरद्वारे वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालवित असल्याचे आढळलेल्या १५ वाहनचालकांवर मोटारवाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

मंगळवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत कोल्हापूर नाका आणि कृष्णा कॅनॉल परिसरात विशेष नाकाबंदी करण्यात आली होती. वाहनचालकांची ब्रेथ ॲनालायझरच्या साहाय्याने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या १५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आणि कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जगदाळे, आर. डी. देशमुख, सहाय्यक फौजदार मोहन जगताप, पोलीस हवालदार गोकुळ हादगे, जयवंत गोसावी, अश्विनी सूर्यवंशी, रतन चव्हाण, अमोल पवार, सत्यजीत नेवसे, सचिन साळुंखे, पोलीस नाईक महेंद्र सावंत तसेच पोलीस शिपाई शशिकांत घाडगे, प्रशांत मोहिते, अक्षय खोत, शिवनंदन नारायणी आणि आशिष पाटील यांनी सहभाग घेतला. दरम्यान, आखाडीच्या काळात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधातील विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असून, नागरिकांनी स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन कराड शहर पोलिसांनी केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in