Karad : खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन; रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन

कराड शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी शहरातील आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी खड्ड्यामध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच खड्ड्यांभोवती रांगोळी काढून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
Karad : खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन; रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन
Karad : खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन; रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन
Published on

खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजनकराड : कराड शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी शहरातील आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी खड्ड्यामध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच खड्ड्यांभोवती रांगोळी काढून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. फटाक्यांचा आवाज कानावर आदळल्यानंतर तरी पालिका प्रशासनाचे डोळे उघडतील का? असा प्रश्नही या कार्यकर्त्यांनी केला आहे.

यावेळी, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आनंदराव लादे, जान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेद नायकवडी, दत्तात्रय दुपटे, विजय काटरे, संजय कांबळे, विकास लोंढे, दत्तात्रय पवार, मल्हारी गुजले, आसिफ मुल्ला व कार्यकर्ते उपस्थित होते.

खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन
खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन

कराड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रामणात खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. अनेक अपघात होऊन नागरिकांना शारीरीक दुखापतीबरोबरच वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.

खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन
खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन

याबाबत अनेकदा मागणी करूनही खड्डे बुजवले जात नसल्याने शहरातील आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनोखे आंदोलन करून पालिकेचे लक्ष वेधले आहे.

संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी

नव्याने केलेले रस्तेही खड्डेमय झाल्याने पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच खड्डयांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in