कराडमध्ये पाणी कपात; दिवसातून एकदाच तासभर पाणीपुरवठा, ३० ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

कराड शहरातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन नगरपालिकेने पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कराडमध्ये पाणी कपात; दिवसातून एकदाच तासभर पाणीपुरवठा, ३० ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
कराडमध्ये पाणी कपात; दिवसातून एकदाच तासभर पाणीपुरवठा, ३० ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
Published on: 

कराड : कराड शहरातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन नगरपालिकेने पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत दिवसातून एकदाच एक तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ ते ११ नोव्हेंबरदरम्यान दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा केला जाईल. मात्र, १२ नोव्हेंबरपासून पुन्हा दिवसातून एकदाच एक तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कराड शहराची लोकसंख्या सुमारे एक लाख १५ हजार असून, शहराला दररोज सुमारे दोन कोटी १६ लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. सध्याची पाणीटंचाई लक्षात घेऊन शासनाने नगरपालिकांना पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कराड नगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

यावेळी नगराध्यक्ष यादव म्हणाले, भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नगरपालिका चार नवीन पाण्याचे टँकर मागवत आहे. तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांना प्रथम नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतरही पाण्याची नासाडी सुरू राहिल्यास संबंधितांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in