कराडमध्ये मानवी साखळीतून 'VOTE' शब्दाची रचना; ५०० विद्यार्थ्यांचा मतदान जागृतीत अनोखा सहभाग

सार्वत्रिक कराड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत कराड येथील यशवंत हायस्कूलने मतदानाविषयी सजगता निर्माण करणारा अभिनव उपक्रम राबवला.
कराडमध्ये मानवी साखळीतून 'VOTE' शब्दाची रचना; ५०० विद्यार्थ्यांचा मतदान जागृतीत अनोखा सहभाग
कराडमध्ये मानवी साखळीतून 'VOTE' शब्दाची रचना; ५०० विद्यार्थ्यांचा मतदान जागृतीत अनोखा सहभाग
Published on

कराड : सार्वत्रिक कराड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत कराड येथील यशवंत हायस्कूलने मतदानाविषयी सजगता निर्माण करणारा अभिनव उपक्रम राबवला. शाळेच्या मैदानावर तब्बल ५०० विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून 'VOTE' हा शब्द साकारला, तर त्यानंतर शहरात रॅली काढून सर्वांना मतदानासाठी प्रोत्साहित केले.

मुख्याध्यापक सुनील महामुलकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी समन्वय साधत परिश्रम घेतले. या उपक्रमाला स्वीप पथकातील सुनील परीट, आनंदराव जानुगडे, ऋषिकेश पोटे, संतोष डांगे, आदी अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कराडमध्ये मानवी साखळीतून 'VOTE' शब्दाची रचना; ५०० विद्यार्थ्यांचा मतदान जागृतीत अनोखा सहभाग
कराडमध्ये मानवी साखळीतून 'VOTE' शब्दाची रचना; ५०० विद्यार्थ्यांचा मतदान जागृतीत अनोखा सहभाग

या प्रसंगी आनंदराव जानुगडे यांनी विद्यार्थ्यांकडून मतदान जागृतीची प्रतिज्ञा घेतली. तर सुनील परीट यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदानासाठी प्रवृत्त करावे आणि स्वतः मतदान करण्याची शपथ द्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक महामुलकर यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in