कर्नाटक परिवहन सेवा लोकप्रिय; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक

कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची 'प्रतिष्ठित सेवा' अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे.
कर्नाटक परिवहन सेवा लोकप्रिय; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक
एक्स @PratapSarnaik
Published on

मुंबई : कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची 'प्रतिष्ठित सेवा' अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात देखील करणे शक्य आहे, असे कौतुकोद्गार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर होते. रविवारी बंगळुरू येथे त्यांनी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री डॉ. रामलिंगा रेड्डी, राज्याचे परिवहन सचिव डॉ. एन. व्ही. प्रसाद, कर्नाटक राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष रिझवान नवाब, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

प्रीमियम सेवेच्या बसेसची पाहणी

मंत्री सरनाईक यांनी कर्नाटक राज्य परिवहन सेवेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अंबारी, ऐरावत, राजहंस यासारख्या प्रीमियम सेवेच्या बसेससह इतर बसेसची पाहणी केली. तसेच या बसेस कशा पद्धतीने चालवल्या जातात याची माहिती घेतली. आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बस सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. खासगी बसेसच्या तुलनेमध्ये सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्यासाठी या बस सेवा अतिशय प्रसिद्ध असल्याबद्दल सरनाईक यांनी सेवेचे कौतुक केले.

logo
marathi.freepressjournal.in