कास पठारावर पर्यटकांसाठी बैलगाडीची सफर; ग्रामीण पर्यटनाला नवे वळण

साताऱ्याजवळील कास पठाराच्या पर्यटनात आता एक वेगळा अनुभव जोडला गेला आहे. कुसुंबीमुरा येथील शेतकरी ज्ञानेश्वर आखाडे यांनी पर्यटकांसाठी बैलगाडीची सफारी सुरू केली आहे. या नव्या उपक्रमामुळे शहरातील पर्यटकांना निसर्गाच्या कुशीत पारंपरिक ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घेता येणार आहे.
कास पठारावर पर्यटकांसाठी बैलगाडीची सफर; ग्रामीण पर्यटनाला नवे वळण
Published on

कराड : साताऱ्याजवळील कास पठाराच्या पर्यटनात आता एक वेगळा अनुभव जोडला गेला आहे. कुसुंबीमुरा येथील शेतकरी ज्ञानेश्वर आखाडे यांनी पर्यटकांसाठी बैलगाडीची सफारी सुरू केली आहे. या नव्या उपक्रमामुळे शहरातील पर्यटकांना निसर्गाच्या कुशीत पारंपरिक ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घेता येणार आहे.

कास पठारावरील पुष्प हंगाम ४ सप्टेंबरपासून सुरू झाला असून, पावसाच्या विश्रांतीनंतर ऊन पडल्यामुळे फुलांचा बहर चांगला सुरू झाला आहे.

वनविभाग व कास स्थानिक व्यवस्थापन समितीने पर्यटकांसाठी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.

यावर्षी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या सूचनेनुसार बैलगाडी सफारी सुरू करण्याचे ठरले होते.

स्वयंचलित वाहनांच्या युगात, बैलगाडी प्रवास हा एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव ठरतो. ग्रामीण पर्यटनातून निसर्ग, शांतता आणि स्थानिक जीवनशैलीचा अनुभव पर्यटकांना मिळतो. बैलगाडी सफारी स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देते आणि पर्यटकांसाठी आकर्षक अनुभव निर्माण करते.

संदीप जोपळे, वनक्षेत्रपाल, सातारा

पारंपरिक आणि ग्रामीण अनुभव

सफारीमध्ये जुना राजमार्ग वापरून ऑफिस ते कुमुदिनी तलावपर्यंत बैलगाडीचा आनंद घेता येणार आहे. पर्यटकांनी ही सफारी अनुभवताना ग्रामीण जीवनशैली, निसर्ग आणि शांतता याचा थेट अनुभव घेता येईल. याबरोबरच इलेक्ट्रिक गाड्या चालवण्याचे नियोजन देखील आहे, परंतु सध्या पर्यटक बैलगाडीला प्राधान्य देत आहेत, कारण ती अधिक पारंपरिक आणि ग्रामीण अनुभव देणारी आहे.

पठारावर फुले फुलण्यास गुरांची मदत

कास पठारावर ज्या भागात गुरे चराई करतात, त्या ठिकाणी फुलांचे प्रमाण जास्त आहे. गुरांच्या मलमूत्र व खुरांच्या हालचालीमुळे फुलांचे बी पसरते आणि पठारावर फुले फुलण्यास मदत होते. कास पठारावरील बैलगाडी सफारी पर्यावरणपूरक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून शहरवासीय आणि पर्यटकांसाठी नवीन अनुभव घेण्याची संधी ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in