Kasaba By Election : कॉंग्रेसने जाहीर केला उमेदवार; भाजपकडून पुण्यात शक्तिप्रदर्शन

कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (Kasaba By Election) काँग्रेसकडून (Congress) रविंद्र धंगेकर तर भाजपकडून हेमंत रासने यांच्या नावाची केली घोषणा
Kasaba By Election : कॉंग्रेसने जाहीर केला उमेदवार; भाजपकडून पुण्यात शक्तिप्रदर्शन

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasaba By Election) आज दोन्ही पक्षाचे उमेदवार अर्ज भरणार आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे (Congress) उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे नाव घोषित केले.

तर, भाजपकडून (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी देण्यात आली. अशामध्ये आता आज दोन्ही पक्षाचे उमेदवार पोटनिडवणुकीसाठी अर्ज दाखल केला. अशामध्ये आज भाजपकडून यावेळी पुण्यात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. भाजप उमेदवार कसबा ते दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत पायी रॅली काढली. या रॅलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थितीत होते. या रॅलीमध्ये शैलेश टिळक आणि कुणाल टिळक हे अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, दुसरीकडे महाविकास आघाडीने काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवार घोषित केले. यावेळी रवींद्र धंगेकर यांनी केसरीवाड्यात जाऊन शैलेश टिळक यांची भेट घेतली. मुक्ता टिळक यांना अभिवादन करण्यासाठी ते केसरीवाड्यात गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, भाजपने टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने रवींद्र धंगेकर यांची त्यांना दिलेली भेट ही चर्चेचा विषय ठरली आहे. पुणेकरांना माझं काम माहीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि कार्यकर्ते, नागरिक यांच्या जिवावर मी नक्की निवडून येईल, असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in