Abhijit Bichukale : विजय महाविकास आघाडीचा, चर्चा मात्र 'बिग बॉस' फेम अभिजित बिचूकलेंची

बिग बॉस फेम अभिजित बिचूकले (Abhijit Bichukale) यांनी माझा मोठ्या मताधिक्यांनी विजय होणार असा दावा करत कसबा पेठ पोटनिवडणूक लढवली होती
Abhijit Bichukale : विजय महाविकास आघाडीचा, चर्चा मात्र 'बिग बॉस' फेम अभिजित बिचूकलेंची
Published on

कसबा पेठ (Kasaba ByElection) पोटनिवणुकीचा निकाल समोर आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र, यादरम्यान आणखी एक चर्चा रंगली होती, ती म्हणजे अपक्ष म्हणून उभे राहिलेले अभिजित बिचूकले (Abhijit Bichukale) यांची. पोटनिवडणुकीआधी त्यांनी दावा केला होता की, "मी या मतदारसंघात राहणार असल्यामुळे इथली जनता मलाच निवडणून देणार आहे. इथले नागरिक या राजकारण्यांना वैतागले आहेत." असा दावा त्यांनी केला होता. मात्र, या निवडणुकीमध्ये त्यांना फक्त ४६ मते मिळाली आहेत.

बिग बॉस फेम अभिजित बिचूकले हे नेहमी चर्चेत असतात. यावेळी त्यांनी कसबा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. ते म्हणाले होते की, "भकास झालेल्या कसब्याचा विकास करण्यासाठी मी या निवडणुकीला उभा राहतो आहे. मोठ्या मतांनी माझा विजय होणार आहे." असा दावा त्यांनी केला होता. तसेच, लवकरच मी एक पक्ष काढणार असून माझ्या पक्षाची पहिली महिला मुख्यमंत्री माझी पत्नी होणार असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शवला होता. त्यामुळे संपूर्ण पोटनिवडवणुकीमध्ये त्यांना किती मते पडणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांना ४६ मते पडल्याचे समोर आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in