Keshavrao Dhondge passed away : शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन

मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे वयाच्या १०२व्या वर्षी निधन (Keshavrao Dhondge passed away)
Keshavrao Dhondge passed away : शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन
Published on

मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे (Keshavrao Dhondge) यांचे वयाच्या १०२व्या वर्षी निधन झाले. (Keshavrao Dhondge passed away) औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून काम पाहिले असून विधानसभेतील त्यांची अनेक भाषणे प्रचंड गाजली. त्यांनी आमदारकी चांगलीच गाजवली होती. म्हणूनच, ५ वेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले होते. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सभागृहात पोटतिडकीने मांडणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेच्या समस्यांसाठी लढणारा लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

केशवराव धोंडगे यांचा जन्म हा नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामधील गरुळ गावी झाला होता. ते पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांची अनेक भाषणे विधानसभेत गाजली आहेत. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोटतीडकिने विधिमंडळ आणि संसदेत मांडले. आणीबाणीच्या लढ्यामध्येही त्यांनी नेतृत्व केले होते. यावेळी तब्बल १४ महिने त्यांनी कारावास भोगला आहे. १९८५मध्ये गुराखीगड स्थापण करुन जागतिक गुराखी साहित्य संमेलन आणि जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलन भरवून अनोखा विक्रम केला.

logo
marathi.freepressjournal.in