अभिनेत्री केतकी चितळेची 'ती' पोस्ट चर्चेत; म्हणाली, "मोर्चाधारक महापुरुषांनी एका राजकीय नेत्यावर..."

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगेंनी केलेल्या गंभीर आरोपानंतर केतकी चितळेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय.
Ketaki Chitale
Ketaki Chitale

सोशल मीडियावर वादग्रस्त विधानं करुन प्रकाशझोतात येणारी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा चर्चेत आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर केतकीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

केतकी चितळेनं सोशल मीडिया पोस्टवर असं म्हटलंय की, "कालचा दिवस फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःचा कानांनी ऐकले व डोळ्यांनी बघितले, आणि दुसरीकडे, काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चा धारक "महापुरुषांनी" एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले, अशी बातमी ऐकली! जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये." ।।जय हिंद।। ।।वंदेमातरम्।। ।। भारत माता की जय।।

मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत उपोषणादरम्यान फडणवीसांवर जहरी टीका केली होती. मला सलाईनद्वारे विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप त्यांनी फडणवीसांवर केला होता. तसंच ते ब्राम्हण असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर केतकीनं पोस्ट शेअर केल्यामुळे तिची पोस्ट चर्चेत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in