"नार्वेकर बापही दाखवतायत आणि ..."; शिंदे, ठाकरेंच्या वादात केतकीची उडी: फेसबूक पोस्ट करत म्हणाली...

अनेकदा केतकीच्या वक्तव्यांवरुन वादही निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा केतकी एका नव्या कारणाने चर्चेत आली आहे. तिने आता थेट ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेवरुन सुरु असलेल्या वादात उडी घेतली आहे.
"नार्वेकर बापही दाखवतायत आणि ..."; शिंदे, ठाकरेंच्या वादात केतकीची उडी: फेसबूक पोस्ट करत म्हणाली...

मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रिटी केतकी चितेळ ही नेहमी तिच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांसाठी ओळखली जाते. केतकी ही बऱ्याचदा सामाजिक आणि राजकीय घडमोडींवर आपले थेट मत मांडते. अनेकदा तिच्या वक्तव्यांवरुन वादही निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा केतकी एका नव्या कारणाने चर्चेत आली आहे. तिने आता थेट ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेवरुन सुरु असलेल्या वादात उडी घेतली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जावेवारी रोजी शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवत शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचा निकाल दिला होता. हा निकाल कसा चुकीचा आहे हे सांगण्यासाठी ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतली. या परिषदेनंतर राहुल नार्वेकर यांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यावर केतकीने फेसबूकवर पोस्ट केली आहे.

केतकीने फेसबूकवर केलेल्या पोस्टवरुन पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. या पोस्टमध्ये तिने एका वाक्यात आपले म्हणणे मांडले आहे. "नार्वेकर बाप ही दाखवतायत आणि श्राद्ध ही करतायत!!", अशा शब्दात केतकीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, केतकीने केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in