खडवली-कुंभारपाडा रस्ता पुन्हा पाण्याखाली

पावसाळ्यात बहुतांश वेळा हा रस्ता पाण्याखालीच असतो. परिणामी कुंभारपाडा ग्रामस्थ आणि आजुबाजुच्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना खुपच समस्यांचा सामना करावा लागतो
खडवली-कुंभारपाडा रस्ता पुन्हा पाण्याखाली

कल्याण तालुक्यातील खडवली येथील कुंभारपाडा या गावाला खडवली सोबत जोडणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या वसाहती वसल्या आहेत. या वसाहतींमुळे नैसर्गिकरीत्या होणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि पाणी तुंबुन रस्ता पुर्णपणे बंद होतो. पावसाळ्यात बहुतांश वेळा हा रस्ता पाण्याखालीच असतो. परिणामी कुंभारपाडा ग्रामस्थ आणि आजुबाजुच्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना खुपच समस्यांचा सामना करावा लागतो.

वसाहतींद्वारा क्रुत्रीमरित्या उभारण्यात आलेल्या गटारी ह्या गरजेपेक्षा आकाराने लहान असल्यामुळे पाण्याच्या निचरा होण्यास अडचणी निर्माण होतात. तसेच ही बाब कुंभारपाडा ग्रामस्थांनी कित्येकदा वसाहतींच्या बांधकाम व्यवसायीकांच्या तसेच ग्रामपंचायतच्या निदर्शनास आणून दिली, त्या अनुषंगाने काही उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या परंतु तरी देखील समस्या जैसे थे आहे.

या समस्येशी संबंधित सर्व वसाहतींचे बांधकाम व्यावसायिक, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन पावसाच्या पाण्याच्या निचर्यासाठी आवश्यक क्षमतेच्या नवीन गटारी किंवा अस्तित्वात असलेल्या गटारींचे रुंदीकरण करून, पावसाळ्यात उद्भवणारी ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी अशी मागणी ग्रामस्थांमध्ये जोर धरू लागली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in