खडसे यांची गिरीश महाजन यांना कारणे दाखवा नोटीस

यावेळी बोलताना खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षीय राजकीय मतभेद बाजूला ठेवत मनाचा मोठेपणा दाखवत तातडीने एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. याबद्दल त्यांचे कौतुक केले
गिरीश महाजन

गिरीश महाजन

जळगाव : हेतुत: सोशल मिडिया व विविध दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून सामाजिकप्रतिष्ठा मलीन करून बदनामी करण्याच्या उददेशाने जनमानसात गैरसमज पसरवणारे भाष्य केले म्हणून मंत्री गिरीश महाजन यांना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वकीलांमार्फत शिक्षेस पात्र फौजदारी स्वरूपाची तसेच नुकसान भरपाईची दिवाणी कारवाई का करू नये? याची कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी रविवारी सायंकाळी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

एकनाथ खडसे यांना ६ नोव्हेंबरला तीव्र हार्टॲटॅक आला होता. त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सव्दारे मुंबईला हलवण्यात आले होते. तेथे त्यांना मुंबई हॉस्पिटलमध्ये आयसीयूत ठेवण्यात आले होते. उजवी कॉरोनरीआर्टरी १०० टक्के ब्लॉक झााली होती. तेथे एन्जिओप्लास्टी करण्यात आली. दरम्यान, काही क्षण त्यांचे हदय देखील बंद पडले होते. त्यातून ते सुखरूप बाहेर पडले, असे असताना गिरीश महाजन यांनी खडसेंबद्दल बोलताना १३७ कोटींची नोटीस आल्यानंतर सहानुभूती मिळवण्यासाठी केलेले हे नाटक आहे कसली तब्येत खराब आहे अन् कसला ॲटॅक आला आहे? असे विधान केले होते.

माफी न मागितल्यास अब्रूनुकसानीचा दावा

या विधानाला आक्षेप घेत एकनाथ खडसे यांनी अतुल सुर्यवंशी व हरूल देवरे या वकीलांमार्फत खोटे व भ्रामक व दिशाभूल करणारे वक्तव्य केवळ पक्षकाराची बदनामी करण्याचया हेतून करून जाहीर बदनामी केल्याचे नोटीसीत म्हटले आहे. यावर लेखी जाहीर माफी मागण्याची मागणी करत सात दिवसांत माफी न मागितल्यास अब्रूनुकसानीचा दावा करण्यात येईल असे या नोटीशीत म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक

यावेळी बोलताना खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षीय राजकीय मतभेद बाजूला ठेवत मनाचा मोठेपणा दाखवत तातडीने एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. याबद्दल त्यांचे कौतुक केले व हा मोठेपणा कुठे व बंद पडलेले हृदय परत सुरू झााले त्याचे कौतुक करणे सोडून, अशी विधाने केल्या बद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in