ऊसाच्या फडात अल्पवयीन मुलाची हत्या

ऊसाच्या फडात विक्रम विजय खताळ या मुलाची धारधार शस्त्राने वार करून मृत्यू झाला आहे.
ऊसाच्या फडात अल्पवयीन मुलाची हत्या
Published on

कराड : ऊसाच्या फडात विक्रम विजय खताळ या मुलाची धारधार शस्त्राने वार करून मृत्यू झाला आहे. ही घटना कोरेगाव तालुक्यात शनिवारी रात्री घडली असून याबाबतचा गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोऱ्यात असलेल्या हिवरे गावातील विक्रम विजय खताळ (वय १३) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचा मृतदेह ऊसाच्या फडात शनिवारी सायंकाळी उशिरा आढळून आला. खुनामागचे नेमके कारण मात्र, अजूनही अस्पष्ट आहे.

विक्रम खताळ याचा मृतदेह शनिवारी सायंकाळी  हिवरे गावातील एका ऊसाच्या फडात काही शेतकऱ्यांना आढळला. ग्रामस्थांनी पोलिसांना या मृतदेहाची माहिती दिल्यावर वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वाठारच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. मात्र अद्यापही खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही.याबाबतचा गुन्हा रविवारी सकाळी दाखल करण्यात आला आहे. मात्र, हिवरे गावात तणावपूर्ण शांतता आहे.

logo
marathi.freepressjournal.in