
काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीज सोमय्या यांचा कथिक व्हिडिओ प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आता त्यांच्याकडे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ५० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसंकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञान व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करत त्यांचा कथिक व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचं म्हटलं आहे. सोमय्या यांना एक मेल आला होता. त्यात अज्ञात व्यक्तीने सोमय्या यांना त्यांचा कथित अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. "50 लाख द्या, अन्यथा कथित व्हिडिओ व्हायरल करेन", अशी धमकी किरीट सोमय्या यांनी मेलवरुन देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांचा एक अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर हे प्रकरण महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेत आलं होतं. हाच कथित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी अज्ञातांनी सोयमय्या यांना दिली आहे. यानंतर किरीट सोमय्या यांनी पोलीसात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ३८५ अन्वये नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.