किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची उच्चस्थरीय चौकशी होणार ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

प्रकरणाची सखोल चौकशी करुन सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली होती
किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची उच्चस्थरीय चौकशी होणार ;  देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

आज राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवशी सभागृहात चांगलाच गदारोळ माजला. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यासह देशभर एकच खळबळ उडाली. विरोधी पक्षातील अनेकांनी याप्रकरणी सत्ताधारी भाजपाचे तसंच भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे वाभाडे काढले. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी अनेकांनी केली.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरीय चौकशी होईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, "जो विषय मांडला आहे तो गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतातत. माझ म्हणणं आहे की माझ्याकडे पुरावे द्या. कोणालाही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कुठलही प्रकरण दाबलं जाणर नाही. सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल", असं फडणवीस म्हणाले.

आज विधिमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांना व्हायरल व्हिडिओचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी अनेक नेत्यांना ईडी, सीबीआयचे धाक दाखवून पैसै मागितले जात असल्याचं सांगितलं. तसंच अनेक महिलांनी येऊन याबातची माहिती दिली असून माझ्याकडे ८ तासांचे व्हिडिओ असल्याचं दानवे म्हणाले. त्यावेळी त्यांनी काही दलाल महाराष्ट्रात येतात आणि महिलांना त्रास देतात. हा व्यक्ती एक्स्टॉर्शन करत आहे. किरीच सोमय्या असं त्यांच नाव आहे. असं दानवे यांनी सांगितलं.

यावेळी माता भगिनींना त्रास देणाऱ्या किरीट सोमय्यांना सरकार सुरक्षा देणार का? मी त्याचा पेन ड्राईव्ह आपल्याला देतो. असं देखील दानवे म्हणाले आहेत. तर ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी देखील किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढण्याची मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in