पेण अर्बन बँकेच्या ठेविदारांशी साधणार संवाद

स्वागतासाठी पेण भाजप तर्फे जय्यत तयारी
पेण अर्बन बँकेच्या ठेविदारांशी साधणार संवाद

पेण तसेच रायगड जिल्ह्यातील ठेविदारांच्या ठेवींचा अपहार झाल्याने गेली १२ वर्षे अवसायानात असलेली पेण अर्बन बँक आज पुन्हा जिवंत होणार आहे. कारण पेण अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयात भाजप खासदार किरीट सोमय्या आज येणार आहेत. त्यांच्या भेटिकडे ठेविदारांचे लक्ष लागले आहे. ठेविदारांच्या ठेवी कधी परत मिळणार याकडे ठेविदार आणि अनेक पक्षांच्या नेत्यांचे लक्ष आहे. यावेळी ते ठेविदारांशी संवाद साधनार आहेत.

भाजप खासदार किरीट सोमय्या येणार असल्याने आज ४ - ५ महीने खड्यांवर चालणारे पेणकर कमालीची सुखावले आहेत कारण पेण मधील मुख्य रस्त्यांवरील खड्डे पेण नगरपालिका प्रशासनाने बुजविले आहेत. किरीट सोमय्या यांच्या स्वागतासाठी पेणमध्ये जय्यत तयारी सुरु आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in