लॉन्ग मार्चला अकोले पोलिसांकडून नोटीस; पण किसान सभा आंदोलनावर ठाम

आज किसान सभेतर्फे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून लॉन्ग मार्चचे आयोजन करण्यात आले होते, मात्र, उन्हाचे कारण देत पोलिसांनी यासाठी नकार दिला होता
लॉन्ग मार्चला अकोले पोलिसांकडून नोटीस; पण किसान सभा आंदोलनावर ठाम

आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून किसान सभेचा लॉंग मार्च निघणार होता. या मार्चसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही किसान सभा मात्र आंदोलनावर ठाम होती. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पुन्हा एकदा शेतकरी किसान सभेचा लॉन्ग मार्च निघाला. अकोले ते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या लोणी येथील घरापर्यंत हा लॉग मार्च काढण्यात आला.

दरम्यान, याआधी पोलिसांनी या लॉन्ग मार्चला परवानगी नाकारली होती. त्यावेळी वाढलेल्या उन्हामुळे हा निर्णय घेतला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. खारघरच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यांनी विनंती केले असल्याचे सांगितले. दरम्यान, किसान सभेचे नेते अजित नवले म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या या मुलांचे हृदय, शेतकरी बापासाठी तीळतीळ तुटलेले आम्ही पाहिले आहे. पोलीस हे आमचे शत्रू नसून ते त्यांचे काम करत आहेत. त्यांनी ते करावे. पण, सरकारला आम्ही उन्हात चालण्याची खूपच चिंता वाटू लागली आहे. पण, शेतकरी आयुष्यभर उन्हात काम करतो. आज मात्र सरकारचा बुरखा फाडायला शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे." असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in