चिकन न दिल्याने चाकू डोक्यात घातला; नववर्षाच्या सुरुवातीलाच पुण्यातील धक्कादायक प्रकार

सोमवार (१ जानेवारी) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कोंढव्याच्या मिठानगर येथील आयशा चिकन नावाच्या दुकानात हा प्रकार घडला.
चिकन न दिल्याने चाकू डोक्यात घातला; नववर्षाच्या सुरुवातीलाच पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यात नवीन वर्षाची सुरवात गुन्हेगारी कृत्याने झाली आहे. पुण्यातील कोंढवा खुर्द येथे चिकन देण्यास नकार दिल्याने एकाने चाकू हल्ला करत चिकन विक्रेत्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना घटली आहे. सोमवार (१ जानेवारी) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कोंढव्याच्या मिठानगर येथील आयशा चिकन नावाच्या दुकानात हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुला शेख याचे मिठानगर येथे आयशा चिकन नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास दुकान बंद करत असताना फिर्यादीच्या तोंड ओळखीचा सुफियान शेख दुकानात आला.त्याने अब्दुलाकडे चिकन मागितले. त्यावेळी त्यांनी दुकान बंद करत असल्याने चिकन मिळणार नाही, असे सांगितले.

अब्दुल्ला यांनी चिकन देण्यास नकार दिल्याचाचा राग आल्याने सुफियान याने फिर्यादी यांना कानशिलात लगावली. त्यांनी याचा जाब विचारला असता, त्याने दुकानातील चाकू अब्दुला शेख यांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले.

याप्रकरणी अब्दुला हाशिम शेख (वय-23 रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्य़ादीवरुन. आरोपी सुफियान अय्युब शेख (वय-24 रा. मिठानगर, कोंढवा खु.) याच्यावर आयपीसी 323, 324 नुसार गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in