आता कोल्हापूर-अहमदाबाद थेट विमानसेवा; २७ ऑक्टोबरपासून सुरूवात

सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी ही सेवा सुरू असेल. कोल्हापूरहून सकाळी...
आता कोल्हापूर-अहमदाबाद थेट विमानसेवा; २७ ऑक्टोबरपासून सुरूवात
(संग्रहित छायाचित्र)
Published on

कोल्हापूर : कोल्हापूर आणि गुजरातचे व्यापारी संबंध आहेत. कोल्हापूरच्या अनेक वस्तू गुजरातमध्ये मोठ्याप्रमाणात विक्री होतात. त्यामुळे कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. त्यासाठी कोल्हापूरहून अहमदाबादला थेट विमान सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. अखेर ही सेवा २७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत माहिती दिली.

२७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर- अहमदाबाद विमानसेवा सुरू होणार आहे. सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी ही सेवा सुरू असेल. कोल्हापूरहून सकाळी ११ वाजता विमान उड्डाण करेल आणि १२ वाजून २० मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल.

स्टार एअर लाईन कंपनीचे सुमारे ५० आसन क्षमतेचे विमान, कोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल. या विमान सेवेमुळे अहमदाबाद सोबतच संपूर्ण गुजरात, राजस्थानसह उत्तर भारताशी कोल्हापूर हवाई सेवेने कनेक्ट होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in