

कोल्हापूर : देवगड जिल्हा हद्द ते दाजीपूर राधानगरी मुदाळतिट्टा- निढोरी-निपाणी कलादगी रस्त्याचे दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे दिनांक १० मार्च ते ३० एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले आहे.
दाजीपूर ते राधानगरी मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. दाजीपूर ते राधानगरी रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करून हलक्या व लहान वाहनांकरीता बालिंगा- महे पाटी- कोते- धामोड- शिरगाव- तारळे- पडळी- कारीवडे- दाजीपूर रस्ता प्रजिमा २९ चा वापर करावा. तसेच अवजड व मोठी वाहतूक या रस्त्यावरून पूर्णपणे बंद करून कोकणातून कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा- नांदगाव- तळेरे- वैभववाडी- गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात यावी. तसेच कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरीता आंबोली अशी वाहतूक वळविण्यात यावी, असेही या अधिसुचनेव्दारे कळविण्यात आले आहे.