कोल्हापूरची प्रारुप मतदारयादी जाहीर सूचना, हरकती नोंदवण्यास ७ दिवसांची मुदत

जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे
कोल्हापूरची प्रारुप मतदारयादी जाहीर सूचना, हरकती नोंदवण्यास ७ दिवसांची मुदत
Published on

कोल्हापूर: मतदान केंद्राची प्रारुप यादी व अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://kolhapur.gov.in/ या संकेतस्थळावर व जिल्हा निवडणूक शाखा तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या नोटीस बोर्डवर जाहीररीत्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत काही सूचना, हरकती असतील तर पुढील ७ दिवसांत नोंदवाव्यात, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे, मतदान केंद्रांच्या स्थानातील बदलाचे, विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे व भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका मतदान केंद्रातील १ हजार ५०० मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या अशा मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे व पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावातील बदल हे सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर यांच्या कार्यालयास मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत, असे ही पत्रकात नमुद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in