कोल्हापूर- वैभववाडी प्रस्तावित रेल्वेमार्गाचे हवाई सर्वेक्षण पूर्ण; पठारी प्रदेशाला कोकणाशी जोडणाऱ्या मार्गावरील स्थानके, बोगद्यांची ठिकाणे अंतिम टप्प्यात

दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकाच्या पठारी प्रदेशाला कोकणाशी जोडणाऱ्या कोल्हापूर ते वैभववाडी या महत्त्वाच्या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठीचे हवाई सर्वेक्षण (Aerial Survey) पूर्ण झाले असून प्राथमिक अहवालानुसार पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील डोंगराळ भागातून मार्गाची प्राथमिक आखणी निश्चित करण्यात आली आहे.
कोल्हापूर- वैभववाडी प्रस्तावित रेल्वेमार्गाचे हवाई सर्वेक्षण पूर्ण; पठारी प्रदेशाला कोकणाशी जोडणाऱ्या मार्गावरील स्थानके, बोगद्यांची ठिकाणे अंतिम टप्प्यात
कोल्हापूर- वैभववाडी प्रस्तावित रेल्वेमार्गाचे हवाई सर्वेक्षण पूर्ण; पठारी प्रदेशाला कोकणाशी जोडणाऱ्या मार्गावरील स्थानके, बोगद्यांची ठिकाणे अंतिम टप्प्यात
Published on

कराड : दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकाच्या पठारी प्रदेशाला कोकणाशी जोडणाऱ्या कोल्हापूर ते वैभववाडी या महत्त्वाच्या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठीचे हवाई सर्वेक्षण (Aerial Survey) पूर्ण झाले असून प्राथमिक अहवालानुसार पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील डोंगराळ भागातून मार्गाची प्राथमिक आखणी निश्चित करण्यात आली आहे. स्थानकांच्या जागा आणि बोगद्यांची संभाव्य ठिकाणे निश्चित करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे.

घाटमाथ्यावरून कोकणात उतरणाऱ्या या मार्गाच्या आखणीदरम्यान दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे जमिनीवरून सर्वेक्षण करण्यास मर्यादा येत होत्या. त्यामुळे आधुनिक LiDAR तंत्रज्ञानाचा वापर करून हवाई सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून जमिनीची उंची, झाडे आणि अन्य अडथळ्यांची अचूक माहिती मिळाल्याने रेल्वेमार्गाचे माहिती रेल्वेच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने दिली.

या प्रस्तावित मार्गामुळे बाजारभोगाव आणि शाहूवाडी परिसरात स्थानके होण्याची शक्यता व्यक्त होत असून स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पर्यटनास चालना मिळण्याबरोबरच कोंकण, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर 'अलाइनमेंट' निश्चित करणे कर्नाटक यांतील अंतर अधिक सुलभ झाले असल्याची लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

रेल्वेमार्गावरील बोगदे आणि पुलांचे मोठे आव्हान

सह्याद्री पर्वतरांगांमधून हा रेल्वेमार्ग जाणार असल्याने अनेक मोठे बोगदे आणि उंच पूल उभारावे लागणार आहेत. घाटातील कामाचे नियोजन अत्यंत सूक्ष्मपणे केले जात असून हवाई सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये आपल्या मालमत्तांवर या प्रकल्पाचा परिणाम होणार का, याबाबत उत्सुकतेसोबतच चिंता व्यक्त केली जात आहे.

माल आणि प्रवासी वाहतुकीत मोठी क्रांती

दरम्यान, हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर हे जिल्हे थेट कोकण रेल्वे मार्गाशी जोडले जाणार आहेत. यामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्ही क्षेत्रांत मोठी क्रांती घडण्याची अपेक्षा असून साखर, गूळ आणि अन्य कृषी उत्पादने कोंकणातील विविध बंदरांपर्यंत जलद गतीने पोहोचवणे शक्य होणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि औद्योगिक विकासासाठी हा मार्ग 'गेम चेंजर' ठरेल, असा विश्वास स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in