कोल्हापूरने चार वर्षाने, तर पालघरने पहिल्यांदाच कब्बडी स्पर्धेत मिळवले विजेतेपद

कोल्हापूरने चार वर्षाने, तर पालघरने पहिल्यांदाच कब्बडी स्पर्धेत मिळवले विजेतेपद

बालेवाडी (पुणे) येथील शरदचंद्रजी पवार क्रीडानगरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूर, तर मुलींमध्ये पालघर विजेते ठरले.कोल्हापूरने चार वर्षाने, तर पालघरने पहिल्यांदा विजेतेपद पटकाविले.सांगलीच्या मुलीना, तर पालघरच्या मुलांना तृतीय क्रमांक मिळाला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा भोसले यांनी केले.

मुलींच्या अंतिम सामन्यात पालघर संघाने पुणे संघावर ३२-३० अशी मात करीत स्पर्धेचे अंतिम विजेतपदासह स्व. चंदन पांडे परभणी फिरता चषकावर आपले नाव कोरले. पालघर जिल्ह्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा त्यांनी ही किमया साधली.

मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर संघाने मुंबई उपनगर संघावर ४०-२७ असा दणदणीत विजय मिळवित स्व. नारायण नागो पाटील-रायगड या फिरत्या चषकासह विजेतेपद पटकाविले. जवळपास चार वर्षांपूर्वी सेलू-परभणी येथे झालेल्या कुमार गट स्पर्धेत कोल्हापूरने विजेतेपद प्राप्त केले होते.

सांगली संघाने मुंबई शहर संघावर ४६-२९ असा दणदणीत विजय मिळवित स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. मुलांच्या तृतीय क्रमांकासाठी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पालघर संघाने परभणी वर ३५-३२ अशी मात केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in