Pune : धर्मगुरूसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांची कारवाई

प्रार्थनेच्या माध्यमातून कर्करोग आणि ट्यूमरसारखे असाध्य आजार बरे करण्याचा खोटा दावा करणाऱ्या एका धर्मगुरूसह आठ जणांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा परिसरातील एका प्रार्थनास्थळात अंधश्रद्धा पसरवण्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एका ३२ वर्षीय महिला कार्यकर्त्याने तक्रार दिली आहे.
धर्मगुरूसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांची कारवाई
धर्मगुरूसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांची कारवाई
Published on

पुणे : प्रार्थनेच्या माध्यमातून कर्करोग आणि ट्यूमरसारखे असाध्य आजार बरे करण्याचा खोटा दावा करणाऱ्या एका धर्मगुरूसह आठ जणांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा परिसरातील एका प्रार्थनास्थळात अंधश्रद्धा पसरवण्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एका ३२ वर्षीय महिला कार्यकर्त्याने तक्रार दिली आहे. पास्टर केनेथ पॉल सिल्वे आणि त्याच्या सात ते आठ कार्यकर्त्यांवर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सक्रिय असलेल्या तक्रारदार महिला रविवारी त्यांच्या एका मैत्रिणीसह या प्रार्थनास्थळात गेल्या होत्या. तेथे उपस्थित स्वयंसेवकांनी त्यांच्याकडून वीस रुपये घेऊन त्यांना प्लास्टिकच्या बाटलीत पाणी दिले, तसेच हे पाणी आजारी भागावर लावल्यास आजार बरा होईल असे सांगितले. त्यानंतर झालेल्या सभेत मुख्य धर्मगुरू केनेथ सिल्वे याने उपस्थितांना मार्गदर्शन करताना, शरीराच्या आजारी भागावर उजवा हात ठेवण्यास सांगून देव कर्करोग व ट्यूमर बरे करेल असा दावा केला.

या संपूर्ण प्रकाराचे फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणीने मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले असता तेथील महिला स्वयंसेवकांनी त्यांना तीव्र विरोध केला. आरोपींनी दोघींना धक्काबुक्की करत त्यांच्या मोबाईलमधील चित्रीकरण बळजबरीने डिलीट केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in